Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सहायक पोलीस निरीक्षकाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिका-याची पोलिसांत तक्रार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिंचवड येथील अजंठानगरमध्ये झालेल्या भांडणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची सूचना केली असता यमुनानगर पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत अरदवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्षा गंगा धेंडे यांच्याशी खालच्या पातळीतली भाषा वापरून त्यांना उधटपणे वागणूक दिली. त्यावर राष्ट्रवादीच्या धेंडे यांनी पोलीस अरदवाड यांच्याविरुध्द पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे तक्रार केली आहे.

यासंदर्भात धेंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड येथील अजंठानगर भागात भांडणाशी प्रेम पवार या व्यक्तीचा संबंध नसताना सहायक पोलीस निरीक्षक अरदवाड यांनी त्याला बसवून ठेवले. सीसीटीव्ही फुटेज चेक करूनच पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी सूचना धेंडे यांनी केली होती. त्यावर अरदवाड यांनी त्यांच्याशी उध्दटपणे बोलून खालच्या स्तरावर जाऊन त्यांच्याशी वादविवाद केल्याचा आरोप धेंडे यांनी केला आहे. त्यामुळे धेंडे यांनी पोलीस आयुक्त पद्मनाभन यांच्याकडे अरदवाड याची तक्रार केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button