Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी पिंपरीत आज सत्याग्रह आंदोलन..!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/images-2020-09-14T100801.056.jpeg)
पिंपरी । प्रतिनिधी
भीमा-कोरेगाव हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी ॲट्रॉसिटी जनजागरण परिषदेच्यावतीने आज सोमवारी १४ सप्टेंबर रोजी ११.३० वाजता पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.
पिंपरी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी मध्ये भीमा कोरेगाव दंगलीमध्ये संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांचा उल्लेख आले होते. सदर फिर्यादीनुसार त्यांना आरोपी देखील करण्यात आले असून तीन वर्षानंतर सुद्धा अद्याप पर्यंत संभाजी भिडे यांची चौकशी देखील पोलिसांकडून झाली नसल्याने त्याचा निषेध करण्यात येणार आहे.