संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/2-38.jpg)
आपत्कालीन रक्तदान शिबीरामध्ये ५६८ जणांनी केले रक्तदान
पिंपरी |महाईन्यूज|
संत निरंकारी मिशनअंतर्गत चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ससून रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी ५६८ युनिट रक्त संकलन केले.
पुणे झोनमधील चाकण ब्रांचने ७२ , हडपसर ब्रांच ने ६७ , जय-जवान-नगर ब्रांचने ८४ , पेरणे-फाटा ब्रांचने ५७ , आव्हाळवाडी ब्रांचने ९१ , नानगाव ब्रांचने ९७ युनिट रक्तदान केले. तसेच आण्णापूर ब्रांचने ६३ युनिट, सांगवी ब्रांचने ३७ युनिट रक्तदान केले. ससून रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी रक्तदान शिबिरे ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी) यांच्या मार्गदर्शनानूसार घेण्यात आली.
कोरोना व्हायरस या आजाराने महाराष्ट्रात थैमान घातल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शासकीय यंत्रणा हैराण झाल्या आहेत. ससून रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांच्या आवश्यकतेनुसार रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. रक्तदान शिबिरात प्रशासन-डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात आले. तसेच सोशल डिस्टंसिंगकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.