Breaking-newsपिंपरी / चिंचवड

शिक्षण समितीसाठी राष्ट्रवादीने अर्ज मागविले

पिंपरी (महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्यांची नियुक्ती 20 जुलै रोजी होणार असून या समितीसाठी इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, 20 जुलै रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण समिती सदस्यांची नियुक्‍ती केली जाणार आहे. शिक्षण समिती सदस्यपदासाठी इच्छुक नगरसेवकांनी 17 जुलैपर्यंत विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन वाघेरे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button