Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
शहरात मोटार अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
![Horrific accident of bus and tempo in Uttar Pradesh; 17 killed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/bike-accident.jpg)
मुंबईः पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या मोटार अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. चाकण येथील खराबवाडी येथे दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दिवांकर मिश्रा याचा मृत्यू झाला तर मागे बसलेल्या गणेश रंडाळे याला गंभीर इजा झाली आहे. सदर गुन्ह्यात अनोळखी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची दुसरी घटना ही म्हाळुंगे येथे घडली आहे. आरोपी याने एस टी बस भरधाव वेगात चालवल्याने रस्ता क्रॉस करणाऱ्या लक्ष्मण नाथ (47) यांना बसची धडक बसली. त्यामुळे त्यांस गंभीर दुखापत झाली. सदर घटनेत बसचालक धनाजी वाघमारे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.