Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विरोधी पक्षनेता पदाबाबत आज फैसला

  • दोन ते तीन दिवसांत नाव जाहीर करणार
  • अजित पवार यांच्या आजच्या बैठकीत होणार चर्चा

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर दत्ता साने यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यानंतर विरोधी पक्षनेता कोण होणार, याबाबत राष्ट्रवादीसह विरोधकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. आज पदाधिका-यांच्या आढावा बैठकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे आज विरोधी पक्षनेते पदासाठी सक्षम पदाधिका-याचे नाव निश्चित होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने दरवर्षी विरोधी पक्षनेता पदी नवीन व्यक्तीला संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या वर्षात माजी महापौर योगेश बहल यांना या पदावर संधी देण्यात आली. त्यानंतर बेधडक शैली असणारे दत्ता साने यांना दुस-या वर्षात संधी मिळाली. त्यांनी आपली कारकिर्द एक सर्वसामान्यांचा कळवळा असलेल्या नेता म्हणून गाजवली. त्यांच्या कामकाजामुळे राष्ट्रवादी खरोखर चर्चेत राहिली. त्यांचाही कार्यकाळ संपल्याने साने यांनी पदाचा रितसर राजीनामा दिला. त्यानंतर या पदावर पुढील वर्षासाठी कोणाला संधी मिळणार, याबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांना तसेच विरोधकांना सुध्दा उत्सुकता लागली आहे. या पदासाठी नाना काटे, जावेद शेख, वैशाली घोडेकर तिव्र इच्छुक आहेत.

याबाबत अजित पवार म्हणाले की, मध्यंतरी अधिवेशन होते. त्यामुळे मी व्यस्त असल्यामुळे विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय घेणे जमले नाही. त्यामुळे आज आढावा बैठकीच्या निमित्ताने त्याबाबत चर्चा केली जाणार आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी सक्षम व्यक्तीचे नाव निश्चित करून येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर केले जाईल, असे पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी आमदार विलास लांडगे, अण्णा बनसोडे, नाना काटे, भाऊसाहेब भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button