Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
विद्यानंद शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत
![Notice to GG International School of Municipal Education Department](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/school-1.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
निगडी येथील तब्बल नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर विद्यानंद भवन हायस्कुल शाळेची घंटा आज वाजली. पहिल्याच दिवशी निम्म्या विद्यार्थ्यांनी हजेरी लावून उत्तम प्रतिसाद दिला. शाळेकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेण्यात आली. प्रवेशद्वारावरच मुलांचे हात सॅनिटायझरने निर्जंतुक केले. तापमान व ऑक्सिजन लेव्हल तपासूनच विद्यार्थ्यांना वर्गात सोडले जात होते. वर्गात एक बेंच सोडून सुरक्षित अंतरावर दिलेल्या त्यांच्या नावसमोरच विद्यार्थी बसत होते. पालकांचे संमतीपत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच वर्गात प्रवेश दिला गेला. माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका छाया हब्बू यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका जया श्रीनिवास, पर्यवेक्षिका मनीषा सुर्वे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता.