पिंपरी / चिंचवड
लक्ष्मण मानकर यांचे निधन

पिंपरी – वाकड गावचे ज्येष्ठ नागरिक, प्रगतीशील शेतकरी लक्ष्मण पंढरीनाथ मानकर (वय 78 वर्षे) यांचे वृध्दापकाळाने रहात्या घरी कस्पटे वस्ती येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे, पणतू असा परिवार आहे. बजरंग दल वाकड प्रखंडाचे संयोजक ओमकार अनिल मानकर यांचे ते आजोबा होत.





