Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘एक रुपया पुणे मनपासाठी’ अनोखे आंदोलन

पुणे –  वारक-यांसाठी नानापेठ आणि भवानी पेठेत करण्यात येणा-या पत्र्याच्या शेडबाबत महानगरपालिकेने दाखविलेल्या उदासिनतेचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘एक रुपया पुणे मनपासाठी’ अनोखे आंदोलन करून निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार आणि वारक-यांनी देखील महानगरपालिकेच्या गंगाजळीसाठी दानपेटीत एक रुपया टाकून आपला निषेध नोंदवला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक रवींद्र माळवदकर यांनी १९९२ मध्ये वार्डस्तरीय निधीतून वारक-यांच्या निवा-यासाठी मंडप टाकला होता. पुणे मनपाने दरवर्षीप्रमाणे यंदाही वारक-यांच्या निवा-याची सोय करावी या संदर्भात १७ मे २०१८ रोजी निवेदन दिले होते. परंतु, मिरा-भाईंदर मनपा संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालाचा संदर्भ देत महापालिकेने पुरेसा निवारा उभारण्यासंदर्भात असमर्थता दर्शवली. वारक-यांच्या निवा-याची सोय आणि आरोग्याच्या सुविधा पुरविणे हे पालिकेचे कर्तव्य होते. पालिकेच्या उदासिनतेमुळे वारक-यांचे प्रचंड हाल झाले. महानगरपालिकेच्या या कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. ‘एक रुपया पुणे मनपासाठी’ हे आंदोलन करण्यात आले. त्यात प्रत्येक वारक-याने मदत पेटीत एक रुपया टाकून गळती लागलेल्या पुणे मनपाच्या सभागृहाच्या दुरुस्तीचे काम करुन घेण्यासाठी तसेच वारक-यांसाठी पत्र्याच्या शेड बांधण्यासाठी गंगाजळी निर्माण केली आहे. ही गंगाजळी पुणे महानगरपालिकेकडे सुपूर्द केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button