ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

कुडाळ येथे ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राला अखेर सुरुवात

अनेक वर्षापासून रखडलेले काम नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नातून मार्गी

कुडाळ | ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे असलेले कुडाळ येथील विरंगुळा केंद्र अनेक वर्षांपासून विविध तांत्रिक अडचणींमुळे रखडलेले होते मात्र अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राच्या इमारतीच्या कामाला अखेर प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नातून हे काम मार्गी लागले असून इमारतीवरील स्लॅब भरण्याच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्त यांच्या उपस्थितीत पार पडला.

कुडाळसह पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी हे विरंगुळा केंद्र एक महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे. आयुष्यभर कष्ट करून समाज घडवणाऱ्या ज्येष्ठांना निवांत वेळ घालवण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि विविध उपक्रमांसाठी एक स्वतंत्र जागा उपलब्ध होणार असल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या इमारतीचे काम सुरू झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसत होता या इमारतीचे काम काही वर्षांपासून लालफितीच्या अडचणींमध्ये अडकले होते. अनेकदा प्रयत्न करूनही प्रत्यक्ष काम सुरू होत नव्हते. मात्र बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून या कामाला गती मिळाली आणि अखेर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली.

हेही वाचा       :            PNG कनेक्शनधारकांना LPG सिलिंडर रिफिल नाही; केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

या कामासाठी माजी सरपंच वीरेंद्र शिंदे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे संघाचे अध्यक्ष भाऊराव शेवते यांनी सांगितले.त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे आज हा ऐतिहासिक क्षण आला असल्याचेही शेवते यांनी सांगितले. या विरंगुळा केंद्राचे बांधकाम पूर्ण होऊन कुडाळ आणि पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सुसज्ज आणि आत्मीयतेने भरलेले केंद्र उभे राहणार आहे. अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपून आज प्रत्यक्ष काम सुरू झाल्यामुळे हा दिवस कुडाळच्या इतिहासात ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाचा आणि भावनिक ठरेल असे मत माजी सरपंच विरेंद्र शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

यावेळी विरंगुळा केंद्राच्या पायाभरणीच्या आठवणींनाही आज उजाळा मिळाला. ज्येष्ठ नागरिक संघाचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय मनोज वंजारी यांच्या योगदानामुळेच या केंद्राची संकल्पना पुढे आली होती, असे संघाचे उपाध्यक्ष भिकू राक्षे यांनी सांगितले. माजी सरपंच विरेंद्र शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर महेश पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी भाऊराव शेवते, चंद्रसेन शिंदे, माजी सरपंच विरेंद्र शिंदे, उपसरपंच सोमनाथ कदम, अजिजभाई मुजावर, भिकू राक्षे, विलास कांबळे, आशिष रासकर, ज्ञानेश्वर कुंभार, उत्तम देवकर, जयसिंगराव शिंदे, ननावरे बापू, अरुण किरवे, महेश पवार, अजित शिराळकर, हनुमंतराव शिंदे, बाळकृष्ण राक्षे, बाळासाहेब वारागडे, देवराम चौधरी, नथू दादा कदम, रावसो कुंभार, सुदाम रासकर, दत्तात्रय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button