राष्ट्रवादीच्या अभिप्राय अभियानात सहभागी व्हा; शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांचे आवाहन

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
राष्ट्रवादी पक्षाचा २१ व वर्धापन दिन नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात संपन्न झाला या वर्धापन दिन निमित्त अनेक सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले , महाराष्ट्रात महाविकास आघाडी चे सरकार असून या सरकार मध्ये राष्ट्रवादी चा मोठा वाटा आहे या राष्ट्रवादी पक्षाची पाळेमुळे वाढविण्या करीत तसेच आणखीन मजबूत करण्या करीत राष्ट्रवादी चे अध्यक्ष व खासदार शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन नुसार राष्ट्रवादी पक्षाने “अभिप्राय” अभियान ला सुरवात केली असल्याची माहिती पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली , तसेच जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानांतर्गत आपला अभिप्राय कळवावा असे आवाहन पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केले आहे . पक्षाकडे आपले मत, प्रतिक्रिया, मनोगत कळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. आपले मत पक्षाची पुढील वाटचाल ठरवेल!
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी चे विरोधीपक्ष नेते नाना उर्फ विठ्ठल काटे , , महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर , कार्यध्यक्ष प्रशांत शितोळे, युवक राष्ट्रवादी चे विशाल काळभोर . युवती अध्यक्ष वर्षागायकवाड आदी उपस्थित होते.





