Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
रावेत येथे मनसेतर्फे पतंग वाटप
![MNS distributes kites at Ravet Maharashtra Navnirman Sena, Makarsankrat, Patang, Ravet Ward No. 16, City President Sachin Chikhale, Pravin Mali,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/manse-kasarwadi.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मकसंक्रात उत्सव साजरा करण्यात आलं. या निमित्त मोफत पतंग वाटप करण्यात आले. रावेत प्रभाग क्र.१६ येथे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या अध्यक्षतेखाली मनसे युवानेते प्रविण माळी यांच्या मार्फत पतंगाचे वाटप करण्यात आले. नव्या पिढीला आपल्या जुन्या परंपरा लक्षात राहाव्यात आणि सांस्कृतिक परंपरा जपावी या उदेशाने वाटप करण्यात आल्याचे प्रवीण माळी यांनी सांगितले. या वेळी लहान मुलांनी व तरुणांनी सहभाग घेतला.