राज्यशासनाचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार पिंपरीतील नितीन घोलप यांना प्रदान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/Nitin-Gholap.png)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार यंदा पिंपरी-चिंचवडमधील नितीन घोलप यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
सामाजिक न्याय विभागाचे राज्यस्तरीय पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारांचे वाटप नुकतेच पुण्यात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
घोलप हे मातंग समाजातील क्रियाशील कार्यकर्ते असून विधवा, निराधार तसेच युवक-युवती, अपंग यांना मदत करण्यास व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या काही वर्षापासून सक्रीय आहेत. त्यांच्या निवडीचे सामाजातील सर्व स्तरांतून स्वागत झाले आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार उपस्थित होते.