Breaking-newsमनोरंजन

डॉक्टर मशहूर गुलाटीने साजरा केला सलमान – शाहरुख सोबत जन्मदिवस साजरा

द कॉमेडी नाईट्स विथ कपिल मधील ‘गुत्थी, डॉक्टर मशहूर गुलाटी, रिंकु भाभी’ च्या भूमिकेतून जबरदस्त प्रसिद्धी मिळविणारा अभिनेता सुनील ग्रोव्हर याने नुकताच ४२ व्या वर्षात प्रवेश केला. या वेळी त्याला जन्मदिवसाची खास भेट मिळाली आहे. त्याने आपला वाढदिवस शाहरुख खान आणि सलमान खान या दोन मोठ्या कलाकार मंडळींसोबाबत ‘दस का दम’ शोच्या सेटवर साजरा केला.

यावेळी सुनीलने सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासोबत त्याचा वाढदिवसाचा केक कापला. याबाबतच त्याने आपल्या कोणत्याही सोशल मीडिया माध्यमावर पोस्ट केले नाही. परंतु काही हौशी मंडळींनी त्याचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तो दोन्ही खान मंडळींना केक भरवताना दिसत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button