Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
मुलीला जीवे मारण्याची धमकी देणा-या तरूणाला पोलिसांचा हिसका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/download-9.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – माझ्याशी लग्न कर असे म्हणत तरूणाने अल्पवयीन मुलीला शरीर सुखाची मागणी केली. नकार दिल्याने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार भोसरीत उघडकीस आला.
युवराज निलकंठ चव्हाण (वय 29, रा. साईनाथ कॉलनी, शास्त्री चौक, भोसरी, मुळ. तळणी तांडा, ता. औसा) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 17 वर्षीय मुलीने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चव्हाण फिर्यादी मुलीला गेल्या दोन महिन्यापासून त्रास देत होता. शुक्रवारी आरोपीने फिर्यादीचा हात धरून तिच्या अंगावरून हात फिरवत शरीर सुखाची मागणी केली. तसेच ‘तु माझ्याशी लग्न कर नाहीतर, तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.