मावळच्या विजयानिमित्त खासदार श्रीरंग बारणेंचा उद्धव ठाकरे यांनी केला सन्मान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/IMG-20190527-WA0003.jpg)
पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघातील विजयानिमित्त खासदार श्रीरंग बारणे यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. तसेच बारणे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) मुंबईतील मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बारणे यांचे औक्षण केले. उद्धव ठाकरे यांनी बारणे यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान केला.
यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक रविंद्र मिर्लेकर, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, आमदार मनोहरशेठ भोईर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, तालुका प्रमुख राजु खांडभोर, शहर प्रमुख योगेश बाबर, नगरसेवक प्रमोद कुटे आदी उपस्थित होते.
शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा दारुण पराभव केला. बारणे यांनी तब्बल सव्वा दोन लाखाच्या फरकाने निवडणूक जिंकली आहे. पवार घराण्यातील कुटुंबाचा पहिल्यांदाच पराभव केल्याने बारणे राज्यभरात चर्चेत आले आहेत.