माझा प्रभाग…माझी जबाबदारी : मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसरात अर्सेनिकम ॲल्बम-30 औषधाचे वाटप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/4-15.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
माझा प्रभाग…माझी जबाबदारी…या संकल्पनेअंतर्गत मोशी-बोऱ्हाडेवारी परिसरात कोरोना रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिकम अल्बम-30 या औषधाचे वाटप करण्यात येत आहे, अशी माहिती भाजपा नगरसेवक वसंत बोराटे यांनी दिली.
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रोगावर अद्याप लस उपलब्ध झालेली नाही. जागतिक पातळीवर लसबाबत चाचण्या घेतल्या जात आहेत. मात्र, सध्यस्थितीला नागरिकांनी आपली रोगप्रतिकारशक्ती प्रबळ ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून नागरिकांना अर्सेनिक अल्बम-30 हे औषधनागरिकांनी घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील भाजपा नगरसेवक वसंत बोऱ्हाडे यांच्या पुढाकाराने प्रभागातील १० हजार नागरिकांना अर्सेनिक अल्बम-30 या औषधाचे वाटप करण्यात येणार आहे. औषध मिळवण्यासाठी नागरिकांनी 960462999, 9730111011 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
औषध कसे घ्यावे…?
– रोज सकाळी उपाशीपोटी चार गोळ्या…सलग ३ दिवस घेणे. (बॉटलच्या झाकणातच ४ गोळ्या टाकणे व जीभेवर टाकून चघळणे.) हाच डोस परत बरोबर एक महिन्यांनी परत घेणे म्हणजे रोज सकाळी उपाशीपोटी चार गोळ्या…सलग ३ दिवस घेणे. ३ वर्षांपर्यंतच्या मुलाला २ गोळ्या देणे. घरात कोणाचे कोणत्याही आजाराचे औषध चालू असतील तरी त्या सर्वांनी हे औषध घ्यावे.
काय पथ्य पाळावे…?
औषध सकाळी उपाशी पोटीच घेणे. औषध घेतल्यानंतर कमीत-कमी अर्धा तास काहीही खाउ नये अथवा पाणी पिउ नये. औषधे ज्या दिवशी घेत आहात त्या दिवशी कच्चा कांदा, कच्चा लसून खाउ नये किंवा कॉफी घेवू नये. (भाजीमध्ये कांदा, लसून चालेल.)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/da873bcc-3bb7-40ee-9a58-4defc585efbb-1-1024x731.jpg)