माओवाद्यांशी ‘कनेक्शन’ असणाऱ्यांवर देशभरात सर्च आॅपरेशन ; पुणे पोलिसांची कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/pune-police-raids_201808125807.jpg)
पुणे – बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे पोलिसांनी मंगळवारी (28 ऑगस्ट) पहाटे हैदराबाद, मुंबई, दिल्ली, छत्तीसगड येथे छापे घालून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. यामध्ये वरावरा राव (हैदराबाद), वेरनोन गोन्सालविस, अरुण पाररिया (मुंबई), सुधा भारद्वाज (छत्तीसगड), गौतम नवलाखा यांच्या घरावर छापे टाकून झडती घेतली जात आहे. याबाबत सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी देशातील विविध शहरांमध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे त्याची माहिती अद्याप आलेली नसल्याचं सांगितलं.
पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत माओवाद्यांनी पैसे पुरविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी पुणे पोलिसांनी यापूर्वी परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे, अॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रॉनी विल्सन आणि प्रा. शोमा सेन यांना अटक केली होती. त्यांच्याकडे सापडलेल्या 200 ई-मेलमध्ये या पाच जणांचा बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याचे दिसून आले.