महापालिकेत वर्षांनूवर्ष ठाण मांडलेल्या अभियंत्यांच्या बदल्या कधी?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/pcmc-7.jpg)
पिंपरी चिंचवड ग्राहक हक्क संघर्ष समितीची आयुक्तांकडे तक्रार
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागात कनिष्ठ अभियंता, उपअभियंता वर्षांनूवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहे. परंतू, उच्च न्यायालयाने अधिकारी व कर्मचा-यांबाबत बदली धोरण निश्चित केलेले आहे. एकाच विभागात तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीत काम करता येत नाही. तरीही महापालिकेच्या स्थापत्य व बांधकाम विभागातील अधिकारी एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांच्या तातडीने बदल्या कराव्यात, अशी मागणी पिंपरी चिंचवड ग्राहक हक्क संघर्ष समितीचे शहराध्यक्ष अमोल उबाळे यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे त्यांनी तक्रार केलीय. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनातील गट अ ते गट ड मधील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या दरवर्षी बदल्या करण्यात येत नाहीत. उच्च न्यायालयाने निर्देश केल्यानूसार व राज्य शासनाच्या आदेशान्वये तीन वर्षात एकाच विभागातील अधिकारी व कर्मचारी नियमानुसार बदलीस पात्र ठरतात. त्यानूसार महापालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या होणे अपेक्षित आहे.
प्रत्येक विभागांमध्ये तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले असंख्य अधिकारी व कर्मचारी बदलीस पात्र ठरत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी, कर्मचा-यांचे अनेक ठेकेदारांशी अर्थपुर्ण संबंध तयार झाले आहेत. त्यामुळे कित्येक अधिकारी व कर्मचा-यांनी बेहिशोबी संपत्ती मिळविली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/9-1.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/10-1.jpg)
दरम्यान, महापालिकेच्या स्थापत्य, बांधकाम परवानगी उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणा-या अधिका-यांच्या बदली करणे अपेक्षित आहे. याकरिता महापालिकेने संबंधिताची प्रशासनाकडून माहिती तत्काळ बदली करावी, असे उबाळे यांनी म्हटले आहे.