महापालिकेच्या प्रांगणात महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/A-Gallery_1.jpg)
पिंपरी – भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आज सकाळी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूट पक्षनेता नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नगरगोजे, नगरसदस्य राजू मिसाळ, कुंदन गायकवाड, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील अजित पवार, प्रवीण तुपे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रोय, अति. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, उपायुक्त सुभाष इंगळे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुड़े मनोज लोणकर, स्मिता झगडे, सुनिल आलमेलकर, बाळासाहेब खांडेकर, संदीप खोत, सह शहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह विविध पदाधिकारी नगरसेवक अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.