मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे नववे राज्यस्तरीय अधिवेशन अलिबागला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/IMG_20181025_161625507_2.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे या सामाजिक संघटनेचे 9 वे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी (दि. 27) व रविवारी (दि. 28) पीएनपी हॉल, अलिबाग, जि. रायगड येथे करण्यात आले आहे. या अधिवेशनास पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहरातुन हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती पुणे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुधीर दामोदर पुंडे यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली.
अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी (दि. 27) सकाळी 9 वाजता पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष पद शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील भूषविणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, पंडीत पाटील, धैर्यशिल पाटील, प्रशांत ठाकुर, माजी आमदार हसन मुश्रीफ, मिनाक्षी पाटील तसेच मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, बीआरएसपीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने, अलिबाग नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत नार्इक आदी उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनाच्या सुरुवातीला शिवशाहिर राजेंद्र कांबळे यांचा पोवाडा होणार आहे. दुपारच्या सत्रात दुपारी ‘आर्थिक सक्षमीकरण, आणि कृषी व उद्योग व्यवसायातील संधी’ या विषयावर उद्योजक राजेंद्र धुरगुडे-पाटील, धर्मेंद्र पवार, मिटकॉनचे मुख्यव्यवस्थापक गणेश खामगळ, नाशिकच्या सह्याद्री फाऊंडेशनचे विलास शिंदे, उद्योजक मनोज कदम मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार बाळाराम पाटील, भरतशेठ गोगावले, अनिकेत तटकरे, सुरेश लाड, उद्योजक जे. एम. म्हेत्रे व चित्रलेखा पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.
दुपारी साडेतीन वाजता ‘दहशतवादाचे बदलते स्वरूप’; ‘भिमा कोरेगाव दंगल प्रकरण’; ‘सनातन संस्था समाजसुधारकांच्या झालेल्या हत्या’ आदी विषयांवर आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आयपीएस अधिकारी एस. एम. मुश्रीफ, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अमोल मिटकरी व प्रवक्ता यशवंत गोसावी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार निरंजन डावखरे, आमदार अवधुत तटकरे, आमदार मनोहरशेठ भोर्इर आदी उपस्थ्ति राहणार आहेत. सांयकाळी साडेपाच वाजता ‘मोर्च पे चर्चा’; ‘मराठा समाजाने काढलेले मोर्चे’; ‘महाराष्ट्रात निघालेले बहुजन क्रांती मोर्चे’; ‘मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षण यापुढील समस्या’ या विषयांवर बामसेफचे नेते कुमार काळे, अखिल भारतीय मराठा महासंघचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर, ओबीसी सेवा संघाचे प्रदिप ढोबळे, महाराष्ट्र मुस्लिम संघाचे अध्यक्ष फकीर मोहम्मद ठाकूर यांच्याशी झी चोविस तासचे निवेदक अजित चव्हाण संवाद साधणार आहेत.
रविवारी (दि.28) सकाळी 9 ते 10 प्रत्येक जिल्हा पदाधिका-यांचे मनोगत होणार आहे. सकाळी 10 वाजता ‘समाजकारण व राजकारणातील वर्तमान स्थिती’; ‘गुन्हेगारी प्रवृत्तीचे राजकारण’; ‘आर्थिकतेतून होणारे राजकारण लोकशाहिस मारक’; राजकारणाकडे युवकांचा पाहण्याचा दृष्टीकोन या विषयांवर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता श्रीमंत कोकाटे, राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार, ज्येष्ठ व्याख्याते प्रदिप सोळुंके मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 11: 30 वाजता ‘प्रचार, प्रसार माध्यमे व सोशल मिडीयाचे अनन्य साधारण महत्व’ विषयांवर ज्येष्ठ पत्रकार ब्रम्हा चट्टे पाटील, रविकांत वर्पे, राजकुमार घोगरे, भय्या पाटील, महादेव बारगुडे, अनिल माने आदी मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 2 वाजता अशिवेशानाच्या समारोप सत्रात प्रमुख पाहुणे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार रणजितसिंह माहिते पाटील, बारामती ॲग्रोचे रोहीत राजेंद्र पवार, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, उपाध्यक्ष आस्वाद पाटील आणि अध्यक्षपदी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रविणदादा गायकवाड उपस्थित राहणार आहेत. यावेळी मराठा सेवा संघाचे महासचिव विजय कुमार ठुबे, मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष विजय घोगरे, उद्योजक जेएम म्हात्रे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, ज्येष्ठ व्याख्याते प्रदिप साळुंखे, मराठा आंदोलक महिला नेत्या जयश्रीताई शेळके, राष्ट्रमाता जिजाऊ तैलचित्राचे निर्माते बंडूभाऊ मोरे, ॲड. समीर घाटवे, संजय उरमोडे यांना मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशीही माहिती पुणे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे व पिंपरी चिंचवड महानगराध्यक्ष सुधिर दामोदर पुंडे यांनी दिली.