मराठा आरक्षण आंदोलनात आत्मबलीदान केलेल्या शहिदांना श्रध्दांजली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/photo-01-1.jpg)
पिंपरी – मराठा आरक्षणामध्ये आत्मबलीदान केलेल्या काकासाहेब शिंदे आणि जगन्नाथ सोनवणे तसेच पोलिस कर्मचारी शाम काटगावकर यांना निगडीतील भक्ती शक्ती उद्यान येथे रविवारी (दि. 29) शहर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे या पक्षांच्या वतीने आणि विश्व श्रीराम सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामुहिक श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. असे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, ज्येष्ठ नगरसेवक व माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक मारुती भापकर, माजी नगरसेविका शमिम पठाण, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.