शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा १६ हप्ता आज जमा होणार

PM Kisan | शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारने विविध योजना आणल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. अशातच आता आज शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. तर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ६००० रुपये जमा होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकाचवेळी राज्य आणि केंद्राचे मिळून ६००० रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान योजनेचे २००० रुपये तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता मिळून ४००० रुपये असे एकुण ६००० रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
हेही वाचा – अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले..
राज्यातील सुमारे ८८ लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येईल. केंद्र शासनाने २८ फेब्रुवारी २०२४ हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज PM किसानचा १६ वा हप्ता जारी करतील. या अंतर्गत सुमारे ९ कोटी शेतकरी कुटुंबांना २१ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे.




