breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपच्या निष्ठावंतांवर जबाबदारी, तर बेजबाबदारांची ‘हकालपट्टी’, सरचिटणीस पदी चौघांची वर्णी

  • अमोल थोरात यांच्यावर संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी
  • शेडगे, दुर्गे, नायर, फुगे यांची सरचिटणीस पदी लागली वर्णी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांच्या कार्यकारणीत बदल होऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवड शहर भाजप अध्यक्ष पदाची धुरा आमदार महेश लांडगे यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर आता भाजपने शहराची जम्बो कार्यकारणी जाहीर केली. त्यामध्ये संघाची पार्श्वभूमी असलेले भाजपचे निष्ठावंत अमोल थोरात यांची संघटन सरचिटणीसपदी निवड झाली. तर, सरचिटणीस पदी नवीन चार चेह-यांना संधी देण्यात आली.

सध्या करोनाचे राज्यावर किंबहुना देशावर भयावह सावट आहे. त्यामुळे राज्य सरकारने आगामी महापालिका निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड महापालिका दोन वर्षांवर येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी कार्यकारणीत बदल करण्यात आले. भाजपचे माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना शहराची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्यानंतर आता लागलीच शहर कार्यकारणी घोषीत केली आहे. पूर्वीच्या पदाधिका-यांना विरिष्ट पदाची जबाबदारी देण्यात आली. तर, काही बेजबाबदार निष्क्रिय पदाधिका-यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. यापुढे शहर पातळीवर पक्षाचे जोमाने काम व्हावे, यासाठी नवीन तडफदार कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.

भाजपचे प्रवक्ते तथा सरचिटणीस अमोल थोरात यांच्याकडे आगामी कार्यकाळासाठी संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविली आहे. तर, सरचिटणीस पदी भाजपचे कट्टर समर्थक मानले जाणारे माजी नगरसेवक राजू दुर्गे, स्वी. नगरसेवक एड. मोरेश्वर शेडगे, बाबू नायर आणि विजय फुगे यांची नियुक्ती केली आहे. यातील दुर्गे आणि शेडगे यांच्याकडे भाजपचे निष्ठावंत म्हणून पाहिजेत जाते. बाबू नायर यांनी 2017 च्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपत प्रवेश केला. त्यांच्या हुशारीची आणि कार्यपध्दतीची दखल घेऊन त्यांना संधी देण्यात आली. त्यांना आमदार जगतापांचे समर्थक मानले जाते. तर, विजय फुगे हे भोसरीचे आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप

भाजपचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नविन पदाधिका-यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यामध्ये बारा उपाध्यक्ष, सोळा चिटणीस, पंधरा जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशी एकूण 74 जणांची यादी जाहिर करण्यात आली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष आ. महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, लेखा समितीचे माजी अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, ज्येष्ठ नेत्या उमा खापरे, गटनेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button