Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भांडणाचा जाब विचारल्याने एकाच्या डोक्यात बांबुने मारहाण

पिंपरी – पूर्वीच्या भांडणाचा जाब विचारल्यामुळे दोघांनी एकाच्या डोक्यात लाकडी बांबुने मारहाण केली आहे. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

विकास अनिल जाधव (वय 27) आणि अनिल किसन जाधव (वय 54, दोघेही रा. शिवनाथ जांभुळकर बिल्डींग, हिंजवडी) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी लक्ष्मी सरसय्या गोडी (35, रा. विकास थोपटे बिल्डींग, साखरेवस्ती, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी गोडी यांच्या पुतण्याला पूर्वी मारहाण केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी गोडी जाधव यांच्याकडे गेले होते. भांडणाचा जाब विचारला असता अनिल जाधव यांनी त्यांना दमदाटी करून शिवीगाळ केली. त्यावर त्यांचा मुलगा विकास याने गोडी यांना लाकडी बांबुने डोक्यात मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button