breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
फ्रान्स आैद्योगिक शिष्टमंडळाची महापालिकेला भेट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/b6eb9e37f060b41e2d9dba7ae79b9aad_XL.jpg)
पिंपरी- फ्रान्स येथील औद्योगिक शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड शहराच्या औद्योगिक क्षेत्राशी संबंधित, तसेच स्मार्ट सिटी संदर्भात तांत्रिक क्षेत्रात मदत करण्यासाठी व विविध माहितीची देवाणघेवाण होण्यासाठी महापालिकेला भेट देऊन माहिती घेतली.
महापौर नितीन काळजे यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौघुले, नगरसदस्या सुजाता पालांडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सल्लागार मंत्री आणि दक्षिण आशिया प्रादेशिक सेवेचे प्रमुख फ्रान्सचे दूत जीन-मार्क फेनेट, फ्रान्सचे आर्थिक सल्लागार जीन-मार्क मिग्नोन, सल्लागार बाह्य संबंध आणि कायदेशीर बाबी, प्रादेशिक आर्थिक सेवा, फ्रान्समधील दुतावास इलिका खन्ना-मन्न आदी उपस्थित होते.