Breaking-newsपिंपरी / चिंचवड

फुगेवाडी माध्यमिक शाळेला स्वतंत्र मुख्याध्यापक द्या, पिंपरी युवासेनेची मागणी

पिंपरी, (महाईन्यूज) – फुगेवाडी येथील कै. मीनाताई बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयासाठी स्वातंत्र मुख्यध्यापकाची नेमणूक करावी, अशी मागणी पिंपरी विधानसभा मतदार संघातील युवासेनेच्या वतीन करण्यात आली आहे.

यासंदर्भात युवासेनेने माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी पराग मुंडे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, बोपखेल, फुगेवाडी, दापोडी, कासारवाडी या सर्व शाळेचा अधिभार एका मुख्यध्यापकावर आहे. एक मुख्याध्यापक अपेक्षीत वेळ देऊ शकत नाही. त्याचा परिणाम शाळेची पटसंख्या आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता घटण्यावर होत आहे.

येत्या पंधरा दिवसांत शाळांना स्वतंत्र मुख्यध्यापक नेमावेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा युवासैनिकांनी दिला आहे. शिक्षण अधिकारी पराग मुंडे यांना निवेदन देताना युवती सेनाप्रमुख प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, दक्षता समिती सदस्य रवि कोवे, सनी कड, रवी नगरकर आदी उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button