Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपिंपरी / चिंचवड
प्रभाग समिती सभापती निवडणुकीसाठी महापालिकेला मिळाला मुहूर्त

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभाग समित्यांच्या सभापती पदासाठी निवडणुक घेण्यात येणार आहे. यासंबंधीत नगरसचिव विभागाने आदेश जारी केला आहे. या निवडणुका 9 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी साडेअकरा वाजता अपंग कल्याण पुणे विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग समिती सभापती पदाचा कार्यकाळ संपूष्टात आला. दरम्यान, कोरोनाच्या विदारक परिस्थितीमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश राज्य सरकारने काढला होता. आता या निवडणुका ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या नगरसचिव विभागाने निवडणुकाची प्रक्रिया जाहीर केली आहे.





