Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पोलिस आयुक्तांचा करिष्मा, कर्मचा-यांच्या बदल्याबाबत तीन महिन्याचे काम दोन तासात पुर्ण

  • पोलिसांना कर्मचा-यांना एकच टास्क, नागरिकांचा फोन आला की पाच मिनिटात हजर रहा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त आर.के.पद्यनाभन यांनी पोलिस कर्मचा-यांच्या बदल्यात पारदर्शक धोरण राबविले आहे. पोलिस आयुक्तालयातील कर्मचा-यांच्या बदली धोरणाबाबत त्यांनी आज (मंगळवार) कर्मचा-यांचा दरबार आयोजित केला. त्या दरबारात कर्मचा-यांना आवश्यकतेनूसार बदली देताना नियम व अटी लागू केले होते. त्यामुळे कर्मचा-यांच्या मनातील शंका, वरिष्ठांना मॅनेज करायला हवं होते. सेटींग करायला हवं होते. याविषयी कोणतीच तिळमात्र शंका शिल्लक राहणार नाही. पोलिस ठाण्यातील उपलब्ध जागा, तेथील नियम व अटी पुर्ण करणा-या कर्मचा-यांना बदलीस पात्र राहिले आहेत, असा संदेश या दरबारातून दिला आहे.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यालयातंर्गत नव्याने स्थापन झालेल्या पोलिस चाैकी आणि पोलिस ठाण्यातील शेकडो पदे रिक्त आहेत. त्या जागेवर आपली बदली व्हावी, याकरिता खात्यार्तंगत पोलिस कर्मचा-यांनी प्रशासकीय आणि विनंती अर्ज केले होते. त्यानूसार तब्बल सहाशेहून अधिक पोलिस कर्मचा-यांचे अर्ज पोलिस आयुक्तालयात प्राप्त झाले होते.

पोलिस कर्मचा-यांनी बदली अर्ज देताना आई वडील वयोवृध्द आहेत, त्याची काळजी घ्यावी लागते, मुलाच्या शिक्षणास अडचणी येत आहेत. माझ्या वैद्यकीय अडचणीमुळे बदली हवीय, माझ्या घरापासून पोलिस ठाणे जाण्या-येण्यास खुप लांब आहे, अशा विविध कारणांनी पोलिस कर्मचा-यांनी बदलीचे अर्ज दाखल केले होते. आपली बदली व्हावी, याकरिता ते कर्मचारी सतत पोलिस आयुक्तालयात हेलपाटे मारत होते. त्यामुळेच बदलीबाबत पोलिस कर्मचा-यांचा दरबार आयोजित केला होता.

पोलिस आयुक्त आर. के. पद्यनाभन म्हणाले की, पोलिस कर्मचा-यांच्या बदलीबाबत सतत दोन-तीन महिन्यानंतर अर्ज दाखल होत होते. त्या बदलीमुळे अनेक कर्मचा-याचे काम सोडवून हेलपाटे सुरु झाले होते. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलिस कर्मचा-यांच्या बदलीबाबत अर्ज मागवून त्यांना एकत्रित बोलविले. कोणा-कोणाला कुठे नियुक्ती पाहिजे, याविषयी इच्छुक स्थळे मागविले, त्या बदलीसाठी कारणेही सांगण्यास सांगितले. त्यानूसार सर्वांना पोलिस ठाणे व चाैकीतील रिक्त पदे, त्यांच्या आवश्यकतेनूसार बदलीचे धोरण स्विकारले. त्यात तीन वर्षे झालेले, बदलीची कारणे विचारुन सर्वासमक्ष बदल्या करण्यात येणार आहेत. मात्र, जिल्हातंर्गत बदली झालेल्या कर्मचा-यांना मुख्यालयात ठेवून त्यानंतर बदल्या करण्यात येणार आहे. सर्वांच्या एकाच वेळी, त्याच्या मनासारखे बदल्या करताना नियम व अटी लागू करुन शेकडो कर्मचा-यांच्या बदली करण्याचे समाधान लाभले आहे. त्यामुळे बदली धोरणात पारदर्शकता राहून कोणाच्याही मनात शंका येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button