Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यात अभिनेत्रींकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या सेवानिवृत्त डॉक्टराला अटक

पुणे – हिंदी आणि मल्याळी अभिनेत्रींचा वापर करून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दिल्लीतील एम्स रूग्णालयातील सेवानिवृत्त डॉक्टराला शुक्रवारी (दि.३१ ) अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने डॉक्टराला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

डॉ. सुरेश कुमार सूद (वय ७४, रा. १०८ किंग्ज अपार्टमेंट, मिरा रोड, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टरचे नांव आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस कर्मचाऱ्याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुरेश सूद हा दिल्लीतील एम्स रूग्णालयातून सेवानिवृत्त झाला आहे. पुण्यातील मंगलदास रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमधील रूम नंबर ८०१ आणि ८०४ मध्ये मुंबईतील २४ ते २५ वर्षीय हिंदी आणि मल्याळी अभिनेत्रींचा वापर करून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. हॉटेलमधून दोन अभिनेत्रींना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.

तर डॉ. सुरेश सूदला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या रॅकेटमध्ये पुण्यातील कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करत आहे.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त भानुप्रताप बर्गे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई केली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button