breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे साैदागरची वाहतुक कोडीं सोडविणार

पिंपरी –  पिंपळे सौदागर मधील रहिवाशांना सतत होणा-या वाहतुकीची समस्या लक्षात घेता नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी सांगवी वाहतूक पोलीस निरिक्षक किशोर म्हसवडे यांच्याबरोबर चर्चा करुन वाहतुकीची समस्या सोडविली.  

पिंपळे सौदागर येथे दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. औंध, विशालनगर इथे आयटीयन्स, कामगार वर्ग, विद्यार्थी यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. औंध-पुणे मार्गाने पिंपळे सौदागरकडे येण्यासाठी विशालनगरकडे न वळता जगताप डेअरी मार्गे सावित्रीबाई फुले उद्यानासमोरुन वळसा घालून पिंपळे सौदागरकडे जाण्याचा मार्ग मोकळा केला. पिंपळे सौदागर ही एक स्मार्ट सिटीच्या दिशेने अग्रेसर होत आहे. परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता परिसरातील वाहतूक कोंडीचे प्रश्न सोडविण्यावर नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे हे प्रामुख्याने विशेष लक्ष देत असून विविध विकासकामाच्या माध्यमांतून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button