Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
पिंपरी ते स्वारगेट मेट्रोमूळे 472 घरे होणार बाधित ; मेट्रो स्टेशन विरोधात नागरिकांचे आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/1-10.jpg)
पुणे ( महा ई न्यूज ) – कसबा पेठेतील झांबरे वस्तीतील नियोजित मेट्रो स्टेशनला येथील नागरिकानी तीव्र विरोध केला आहे. गुरूवारी कसबातील नागरिकांनी आंदोलन करून मेट्रो प्रशासना विरोधात घोषणबाजी केली. मेट्रो अधिकाऱ्याना यावेळी बांगडया भेट दिल्या. आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट ( रिच १) आणि वनाज ते रामवाडी ( रिच २) या मेट्रो मार्गाचे काम सध्या प्रगती पथावर आहे. मात्र मेट्रो स्थानके आणि मेट्रो मार्गामुळे सुमारे ६८८ कुटूंबे बाधित होत आहेत. त्यामध्ये २४२ व्यावसायिक मिळकती असून इतर सर्व निवासी मिळकती आहेत.
पिंपरी -चिंचवड ते स्वारगेट या मार्गावरील सर्वाधिक ४७२ घरे बाधित आहेत. सर्वाधिक ८० टक्के मिळकती या पुणे महापालिकेच्या हद्दीतील आहेत. त्यामध्ये २५० कुटूंबे कर्वे रस्त्यावरील बाल तरूण मंडळ (आयडीएल कॉलनी) राजीव गांधी नगर, कामगार पुतळा, तोफखाना या परिसरातील आहेत. तर कसबा पेठेत एकूण २४८ मिळकती असून त्यात ३८ दुकाने बाधीत होत आहेत. तर मंडई येथे ९० मिळकती बाधीत होत असून त्यात ३८ दुकाने आहेत.