पिंपरी चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव वाढला ; आजपर्यत 13 जणांचा बळी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/images-21.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात ‘स्वाईन फ्लू’चा प्रार्दुभाव वाढला आहे. महापालिकेच्या रुग्णालयासह दवाखान्यात लसीसह आैषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लू नियंत्रणासाठी 50 हजार ‘ऑस्लेटॅमिविअर’ कॅप्सूलची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या 18 लाख 95 हजार रुपये खर्चास स्थायी समितीने एेनवेळी मंजूरी दिली. दरम्यान, आजअखेर शहरातील 13 नागरिकांचा बळी गेला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी औषधांच्या दुकानांमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या लसचा तुटवडा आहे. अनेक खासगी मेडीकलमध्ये स्वाईन फ्लूच्या लस उपलब्ध नाहीत. स्वाईन फ्लू’चा वाढता प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे महापालिका आरोग्य वैद्यकीय विभागाने ‘ऑस्लेटॅमिविअर’ कॅप्सूलची खरेदी करणार आहे. 50 हजार नग गोळ्या घेणार आहे. त्या 18 लाख 19 हजार रुपये खर्चास स्थायी समिती सभेत मान्यता दिली. ही अत्यावश्यक बाब म्हणून थेट पद्धतीने औषध खरेदी होणार आहे.