breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या रुपेश चव्हाणने पटकावला  ‘ खासदार श्री-२०१९’ 

 
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र स्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा  संत तुकारामनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे हजारो क्रीडा प्रेमींच्या उपस्थितीत पार पडल्या .खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते खासदार श्री-२०१९ हा किताब देण्यात आला.
पिंपरी-चिंचवडच्या  रुपेश चव्हाण याने खासदार श्री-२०१९ हा किताब पटकावला तर  बेस्ट पोजर अतुल साळुंखे (पुणे) , मोस्ट इंप्रूड  राजेंद्र जाधव ( कोल्हापूर ) , अपकमिंग बॉडी बिल्डर तुषार चोरगे (पिंपरी-चिंचवड ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पिं.चिं.विधानसभा संघटक जितेंद्र ननावरे यांनी स्पर्धेचे आयोजन केले. महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे राजेश सावंत,प्रणव मुजुमदार,विजय मोरे ,संजय महाडिक यांनी पंच म्हणून काम पहिले. विभागप्रमुख राजेश वाबळे,भोलाराम पाटील, रवींद्र ओव्हाळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
याप्रसंगी पुणे जिल्हा संपंर्क नेते बाळाभाई कदम , पिं.चिं.शहरप्रमुख योगेश बाबर, महापालिका गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक निलेश बारणे,सचिन भोसले , जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे , चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, पुणे जिल्हा संघटिका  उर्मिलाताई काळभोर, उपशहरप्रमुख रोमी संधू,तुषार नवले , माजी नगरसेवक किरण मोटे,संतोष सौंदणकर, उद्योजक संतोष बारणे, निलेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button