Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरीत नगरसेविकेच्या मुलाचा अखेर मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/death-3.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेविकेच्या मुलाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्याने आठ दिवसांपूर्वी गळफास घेतला होता.
कौशिक राजू धर (वय 15, रा. थेरगाव) असे त्याचे नाव आहे. संत तुकारामनगर प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा धर यांचा तो मुलगा होता.
कौशिक आकुर्डीतील एका शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता. नैराश्य आल्याने 7 मार्च रोजी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्याला पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.