पार्किंगच्या ठेक्यासाठी आळंदीत वाहनांची तोडफोड
पिंपरी ( महा ई न्यूज ) – आळंदी पालिकेच्यावतीने दिला जाणारा वार्षिक तत्वारिल पार्किंगचा ठेका मलाच मिळाला पाहिजे या कारणावरून आज इंद्रायणी काठावरिल पार्किंगच्या जागेत चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी आळंदीत पाच सहा गाड्यांची तोडफोड केली. पालिकेच्यावतीने पार्किंग गोळा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पांडू भोसले नावाच्या कर्मचाऱ्याला या मारहाणीत डोक्याला गंभिर दुखापत झाली आहे. पायालाही वळ उठल्याचे खुणा दिसत असून याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हा प्रकार दुपारी साडे तिन ते चारच्या दरम्यान आळंदीत झाला. पालिकेच्यावतीने पार्किंग शुल्क गोळा करण्यासाठी दिला जाणाऱ्या वार्षिक ठेका्याची मुदत संपल्याने गेली काही दिवस पालिकेचे कर्मचारीच पार्किंग शुल्क गोळा करत आहेत. मात्र गेली दोन दिवसांपासून शहरातील काही गुंड प्रवृत्तीचे तरूण बेकायदा भाविकांच्या गाड्यांकडून पैसे गोळा करत असल्याचे निदर्शनास आले. आज दुपारी भाविकांच्या गाड्यांची अचनाक तोडफोड केली. पालिकेच्या कर्मचाऱ्यालाही या गुडांनी मारहाण केली. सर्वजण तोंडाला रूमाला बांधून आले होते. याप्रकरणी तोडफोड झालेल्या गाड्या आळंदी पोलिस ठाण्यात लावल्या असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुर आहे.