Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाण्याच्या हौदात पडून बाळाचा मृत्यू, भोसरीतील घटना

पिंपरी | महाईन्यूज

भोसरीमध्ये दोन वर्षांची चिमुकली खेळत असताना पाण्याच्या हौदात पडल्याने बुडून मृत्यू झाला आहे. वेदिका राजू मुळूक वय- २ वर्ष असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. तीचे कुटुंबीय भोसरीमध्ये विवाह सोहळ्यासाठी आलं असता ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत वेदिकाचे कुटुंब पूर्वी राहात असलेल्या घरमालकाच्या मुलाचा विवाह सोहळा गुरुवारी असल्याने आई वडील आणि भावासह ती भोसरीमध्ये आली होती. घराच्या पाठीमागे जमिनीलगत पाण्याचा हौद आहे. त्या ठिकाणी ती एकटीच खेळत असताना हौदात पडली.

बराच वेळ ती दिसत नसल्याने तिचा शोध आई वडिलांसह सर्व जण घेत होते. तेव्हा, पाण्याच्या हौदात पडली असल्याचा संशय आल्याने तिथे पाहिले असता तिचा मृतदेह हौदात दिसला. तिला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. परंतु त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता असं डॉक्टरांनी तिच्या कुटुंबियांना सांगितले असल्याचे माहिती पोलीस कर्मचारी बबन मोरे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button