Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयउद्योग विश्व । व्यापारकोकण विभागताज्या घडामोडीराष्ट्रिय

गोव्यात आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषद; फुकेतमध्ये गोवेकरांसाठी गुंतवणुकीच्या नव्या संधी!

कोंकणी सुपुत्र डॉ. सुनील मांजरेकर आणि पापाचसॉर्न मीपा यांचा संयुक्त पुढाकार

कोंकणी उद्योजकांसाठी थायलंडमधील फुकेटमध्ये व्यवसायासाठी नवे व्यासपीठ!

वार्का बीच (गोवा) : महाराष्ट्र–गोवा उद्योग विस्तारासाठी गेली तीन दशके सातत्याने कार्यरत असलेल्या ‘गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम’चे ग्लोबल अध्यक्ष आणि कोंकणचो सुपुत्र डॉ. सुनील विनायक मांजरेकर यांनी आता थायलंडमधील फुकेत येथे मराठी–कोंकणी उद्योगविस्तारासाठी नवे दालन खुले केले आहे. त्यांच्या ‘एसक्युसीसी प्रॉपर्टीज एलएलसी’ (दुबई) आणि थायलंडमधील प्रसिद्ध ‘फुकेत ९’ या रिअल इस्टेट कंपनीच्या संयुक्त विद्यमाने गोव्यातील ‘द झुरी व्हाइट सॅण्ड्स रिसॉर्ट अँड कॅसिनो’ येथे खास व्यवसाय परिषदेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. गोव्यातील प्रस्थापित व उदयोन्मुख उद्योजकांना फुकेतमधील उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय मालमत्ता गुंतवणुकीच्या संधी, समान विचारांच्या गुंतवणूकदारांशी संपर्क आणि उच्च परताव्याच्या संधींबाबत या परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली. विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध बांधकाम उद्योजक व समाजसेवक श्री. आशुतोष खांडेकर यांच्यासह पन्नासहून अधिक उद्योजक मान्यवर उपस्थित होते.

गोव्यासारखेच जागतिक पर्यटनाचे केंद्र असलेले थायलंड येथील लोकप्रिय फुकेत शहर हे हिंद महासागराच्या निसर्गरम्य किनाऱ्यांनी सजलेले, सांस्कृतिक वैविध्य, व्यापार परंपरा आणि आदरातिथ्य यामुळे जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षण ठरत आहे. विशेष म्हणजे, ‘फुकेत ९’च्या माध्यमातून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची प्रतिकृती जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असून, मराठी–कोंकणी संस्कृतीचा जागतिक विस्तार करण्याचा अनोखा उपक्रमही राबविला जात आहे. या प्रकल्पासाठी गोव्यात श्री. आशुतोष खांडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

फुकेतमध्ये निवासी व व्यावसायिक प्रकल्प उभारून भारतीय—विशेषतः मराठी आणि कोंकणी गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित, आधुनिक आणि उच्च परताव्याच्या संधी निर्माण करण्यात येत आहेत. समुद्रकिनाऱ्यालगत उभे राहणारे हे प्रकल्प हॉटेल्स, सदनिका (कॉन्डोमिनियम्स) आणि आलिशान व्हिला अशा विविध पर्यायांमध्ये उपलब्ध असून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, सुरक्षितता आणि संपूर्ण मालमत्ता व्यवस्थापन सेवा प्रदान करतात.

हेही वाचा –  विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; कोणत्या पक्षाकडून कोण आमदार, पाहा संपूर्ण यादी

डॉ. मांजरेकर यांनी पुढे सांगितले की, फुकेतमधील प्रकल्पांमधून साधारण १०% पर्यंत परतावा अपेक्षित असून, सुमारे ७०% वार्षिक वापरक्षमतेमुळे गुंतवणूकदारांना सातत्यपूर्ण उत्पन्न मिळू शकते. तसेच, संपूर्ण मालमत्ता व्यवस्थापन ‘फुकेत ९’कडूनच केले जाणार असल्याने गुंतवणूकदारांसाठी हा अत्यंत सोयीस्कर पर्याय ठरणार आहे.

या परिषदेची सुरुवात करण्यापूर्वी डॉ. सुनील व्ही. मांजरेकर आणि मिस पापाचसॉर्न मीपा (Kae) यांनी गोव्याचे माननीय मुख्यमंत्री, डॉ प्रमोद सावंतजी यांची विशेष भेट घेऊन त्यांना फुकेत ९ बद्दल माहिती दिली. माननीय मुख्यमंत्री त्यांना या प्रकल्पासाठी विशेष शुभेच्छा दिल्या असून तेथील गणपती मंदिराला भेट देण्याची विनंती डॉ. सुनील व्ही. मांजरेकर आणि मिस पापाचसॉर्न मीपा (Kae) यांनी केली आहे. फुकेतमधील गुंतवणुकीविषयी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी Ms. Shreya Manjjarekar (दूरध्वनी: +971 505343653) यांच्याशी संपर्क साधावा किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क करावा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“गोव्याचो व्यापारी आत्मा आनी जागतिक दृष्टिकोन एकत्र येता, तेव्हा मोठे अवसर तयार जाता. फुकेत हांव केवळ पर्यटन केंद्र ना, तर एक मजबूत गुंतवणूक केंद्र जालो आसा. आमका खात्री आसा की कोंकणी उद्योजकांनी ह्या संधीचो फायदा घेतलो, तर ते जागतिक स्तरावर आपली ओळख अजून भक्कम करतात.”

– डॉ. सुनील व्ही. मांजरेकर.

“भारतीय संस्कृती, परंपरा आणि विशेषतः गोवा व कोंकणी समाजाची ‘अतिथी देवो भव’ संस्कृती मला नेहमीच आकर्षित करत आली आहे. फुकेत आणि गोवा यांच्यात अनेक साम्यस्थळे आहेत—निसर्ग, समुद्रकिनारे आणि सांस्कृतिक संपन्नता. या दोन्ही ठिकाणांतील नातेसंबंध अधिक दृढ व्हावेत आणि गोव्यातील उद्योजकांनी फुकेतमधील संधींचा लाभ घ्यावा, हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे.”

– मिस पापाचसॉर्न मीपा (Kae).

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button