Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पवना धरणग्रस्तांचा प्रश्न सुटल्याशिवाय पुढील वर्षी जलपूजनाला येणार नाही: सुनील शेळके
पिंपरी । प्रतिनिधी
पवना धरणग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न एका वर्षामध्ये सुटला नाही तर पुढील वर्षींपासून धरणाच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाला येणार नसल्याचे आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी दिले आहे.
अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना, धरणग्रस्तांना न्याय मिळाला नाही. याआधीचे सत्ताधारी देखील त्यांना न्याय देऊ शकले नाहीत. एका वर्षात धरणग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर पुढील वर्षीपासून जलपूजनाला येणार नसल्याचे शेळके यांनी म्हटले. धरण पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर याचे पूजन आमदार शेळके यांनी त्यांच्या पत्नी सारिका शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
जवळपास 850 धरणग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळाला नसून, त्यांना न्याय देणे आपले कर्तव्य आहे, असेही ते यावेळी म्हणाले.