पक्षाचे काम तळागाळात पोचून सर्वांना सांगा – खा. श्रीरंग बारणे
पिंपरी विधानसभा पदाधिकारी मेळावा
पिंपरी | प्रतिनिधी
पदाधिकाऱ्यांनी तळागळात जावून शिवसेनेची विचार पोहचवण्याचे व राज्याचे मूख्यमंञी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोचवण्याचे कार्य करण्यास संगितले. शिवसेना प्रमूखांच्या विचारांने पूढे आलेली शिवसेना नेहमी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ही भूमिका घेवूनच काम करते, असे प्रतीपादन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केले.
शिवसेना पिंपरी विधानसभेतील कार्यकर्ताचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. बाबा हरदास राम मंदिर, रिव्हर रोड येथे हा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मा. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी मार्गदर्षण केले. या वेळी माजी आमदार गौतम चाबूकस्वार, महिला संघटिका उर्मिला काळभोर यांनी मार्गदर्शन केले.
या आढावा बैठकीला शिवसेनेचे अनंत कोऱ्हळे. महाराष्ट्र वितरक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश आहेर, पिंपरी विधानसभा समन्वयक माधव मूळे, उपशहरप्रमूख गूलाब गरूड, अल्पसंख्याक आघाडी शहरप्रमूख हाजी दस्तगीर मणियार, विभागप्रमूख अमर कापसे, विभाग प्रमूख खंडू शिरसाठ, उपविभागप्रमूख सावल तोतलानी, विभाग प्रमूख नितीन घोलप, विभाग प्रमूख अनिल पारचा, तसेच पिंपरी विधानसभेतील सर्वच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.





