Breaking-newsपिंपरी / चिंचवड

दिवसाढवळ्या चोरट्याने दुकानातून मोबाईल पळविला

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

दिवसाढवळ्या दुकानात शिरून चोरट्याने मोबाईल पळवून नेला. ही घटना 27 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास जय मल्हारनगर, थेरगाव येथे घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंदविला आहे.

उमेश सीताराम ढमाले (वय 41, रा. जय मल्हारनगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश हे फोटोग्राफर आहेत. त्यांचे थेरगाव कॉलनी क्रमांक पाच येथील जय मल्हारनगर येथे दुकान आहे. 27 नोव्हेंबर रोजी चोरट्याने त्यांच्या दुकानातून दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास एक हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा जिओ कंपनीचा मोबाईल पळवून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button