दादा, आपली वाटचाल हाच आमचा स्वाभिमान, पिंपरी-चिंचवडमध्ये पोस्टर्सबाजी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/अजित_पवार.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये बंडखोरी केल्याने अजित पवार एकटे पडतील, असं वाटत असतानांच आता पवार समर्थकांकडून त्यांच्या निर्णयाचं स्वागत करणारे पोस्टर्स पिंपरी-चिंचवडमध्ये झळकायला सुरवात झाली आहे. खरतर हे राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या उभ्या फुटीचंही दर्शन म्हणावं लागेल. पक्षांतर्ग वाढत चाललेला रोष शमविण्यासाठी स्वतः अजित पवारांनीच आपल्या समर्थकांना आशा प्रकारे पोस्टरबाजी करण्याचा सल्ला दिला असेल का याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी शहरभर अशी फ्लेक्सबाजी करत अजित पवारांचं नेतृत्व आणि निर्णय मान्य केल्याच संदेश देण्याचा प्रयत्न करत अजित पवारांचं समर्थनच केल्याच दिसून येत आहे.
दरम्यान, या पोस्टरबाजी बाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना विचारलं असता, शहरात सुरू असलेल्या फ्लेक्सबाजी बाबत आपल्याला काहीही माहीत नाही, फ्लेक्स लावून कुणी पवार साहेब किंवा अजित पवारांचं समर्थन करत असेल तर हा त्यांचा वैयक्तिक विचार असून आपणही सध्या वेट & वॉचच्या भूमिकेतच असल्याच सांगितले आहे.