दखल : डॉ. संतोष बारणे यांच्या समाजिक कार्याची!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/3-10.jpg)
देशातील राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय संस्था-संघटनांकडून सन्मान
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले डॉ. संतोष बारणे यांच्या सामाजिक कार्याची दखल राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था-संघटनांनी घेतली आहे.
महाराष्ट्र राज्य किक बॉक्सिंग असोसिएशनच्या संचालकपदी कार्यरत असलेले डॉ. बारणे हे नामांकीत ‘सिल्व्हर ग्रुप’चे सर्वेसर्वा आहेत.
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाउन सुरू करण्यात आले. उद्योग- व्यावसाय आणि रोजगार बंद झाल्यामुळे लाखो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. अशा परिस्थितीत उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील चाकरमानी, कष्टकरी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या मदतीसाठी डॉ. बारणे यांनी धाव घेतली.
सॅनिटाईझर, औषध, मास्क, सुरक्षा साधणे यांसह गरजवंत नागरिकांना अन्नधान्य किट वाटपाचा उपक्रम हाती घेतला. हजारो कुटुंबांची भूक भागवण्याचा संकल्प करुन डॉ. बारणे यांनी माझ्याकडे आलेला कोणीही नागरिक उपाशीपोटी परतणार नाही, असा निर्धार केला होता.
दुसरीकडे, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवू लागला होता. राज्य शासनाकडून नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रतिकूल परिस्थितीत खरी देशसेवा करण्याची संधी युवकांनी सोडू नये, असे आवाहन करीत डॉ. बारणे यांनी रक्तदान शिबिराचे आवाहन केले. त्याला परिसरातील युवक-नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
याबाबत बोलताना डॉ. बारणे म्हणाले की, समाजासाठी केलेल्या चांगल्या लोकोपयोगी कार्याची दखल घेवून कोणी सन्मान केला. तर, आपल्याला नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळते.
प्राणीमात्रांवर दया करणारा समाजसेवक…
लॉकडॉउन आणि कोरोनाच्या संकटात हातावर पोट असलेल्या नागरिकांची उपासमार होवू नये. याकरीता संस्था-संघटनांनी पुढाकार घेतला. पण, मूक्या जनावरांचीही उपासमार होवू लागली होती. यावर पुढाकर घेत डॉ. संतोष बारणे यांनी आपल्या परिसरातील भटके श्वान, जनावरे यांच्यासाठी खाद्य उपलब्ध करुन दिले. माणसासोबत प्राण्यांबाबतही संवेदनशीलता दाखवणाऱ्या डॉ. बारणे यांचे समाज माध्यमांमधून कौतूक झाले आहे.
…या संस्था- संघटनांनी केला गौरव
कोरोना संक्रमणाच्या काळात उत्कृष्ट समाजसेवा केल्याबद्दल वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड, लंडन, तसेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲड फिजिकल हेल्थ केअर, इंटरनॅशनल ह्युमन राईट्स, ॲटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया, युनिव्हर्सल डिप्लोमॅटिक अफेअर्स ऑफ ह्युमन राईट्स, कौशल्य सेवा फाउंडेशन, मदर तेरेसा फाउंडेशन संस्थान, एस. के. फस्ट एइड सर्जिकल सोसायटी, चंद्रपूर येथील श्रीवानी नॅट्रोपॅथी केअर ॲड रिसर्च सेंटर, काईंडनेस, ठाणे येथील जनकल्याण सेवा फाउंडेशन, आदी संस्था- संघटनांनी डॉ. संतोष बारणे यांच्या कार्याची दखल घेतली आहे. विशेष म्हणजे, मध्यप्रदेशचे राज्यपाल लाल जी टंडन यांनी गौरवपत्र लिहून डॉ. बारणे यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले आहे.