Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
तब्बल 16 लाख खर्चूनही वायसीएमची एक्स-रे मशीन बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/CoolClips_vc004004.png)
पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) मधील ३ एक्स-रे मशीन बंद अवस्थेत आहेत. सध्या एकाच मशीनवर काम सुरू आहे. सहा महिन्यांपुर्वीच लाखो रुपये खर्च करून मशीनची दुरूस्ती करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा या मशीनमध्ये बिघाड निर्माण झाला. त्यामुळे एवढे पैसे खर्च करूनही मशीनमध्ये बिघाड कसा झाला असा सवाल उपस्थित होत आहे.
सध्या रुग्णालयात एकूण चार मशीन आहेत. या रुग्णालयात एक्स-रे विभागातील तीन मशिन्स बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे एकाच मशीनवर रुग्णांचे एक्स-रे काढले जात आहेत. एकाच मशीनवर कामकाज सुरू असल्याने नागरिकांना अधिक वेळ ताटकळत उभे रहावे लागत आहे. मशीनच्या देखभाल दुरूस्तीसाठी लाखो रुपयांच्या निविदा काढल्या जात आहेत. सहा महिन्यांपुर्वीच एक्स-रे मशीनच्या देखभाल दुरूस्तीसाठी लाखो रुपयांच्या निविदा काढल्या होत्या. बिघडलेली मशीन दुरूस्त करण्यात आली. सहा महिन्यानंतर पुन्हा या तीन मशीनमध्ये बिघाड आला आहे. सहा महिने झाले तरी त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्णांचा त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. लाखो रुपये खर्च करूनही या मशीन बिघडतात कशा? मशीनची दुरूस्ती केली किंवा नाही? असा सवाल या वेळी उपस्थित होत आहे. चुकीच्या पद्धतीने मशीनची दुरूस्ती करणार्या ठेकेदारावर कारवाई होणार का? असा सवाल रुग्णांचे नातेवाईक उपस्थित करत आहेत. तर आम्ही रुग्णांची गैरसोय होऊन देत नसल्याचे या विभागातील कर्मचारी सांगत आहेत.