चिखलीतील दोघांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/chikhli-police-station.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – एका 32 वर्षीय महिलेशी अर्वाच्य भाषेत जातीवाचक व आश्लिल बोलून मानहानी केल्याप्रकरणी चिखली येथील दोघांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिखलीतील पाटीलनगरमध्ये नागेश्वर हायस्कूल समोरील रस्त्यावर बुधवारी (दि. 20) सायंकाळी आठच्या सुमारास घडला.
दत्तात्रय मोरे आणि मनोज मोरे (रा. चिखली, पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित 32 वर्षीय महिलेने याबाबत चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला राहत असलेल्या ठिकाणी दत्तात्रय मोरे बुधवारी सायंकाळी आठच्या सुमारास गेले. पीडित महिलेशी बोलताना त्यांनी याठिकाणी रहायचे नाही. रहायचे असेल तर माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवावे लागलीत, माझे ऐकाने लागेल, अशा खालच्या पातळीवर जाऊन वादविवाद घातला. अन्यथा तुम्हाला लाईट, पाणी, रस्ता मिळू देणार नाही. अशी धमकीही दिली. याशिवाय, जातीवाचक शब्दप्रयोग केला. तसेच, महिलेच्या घराचे लाईटचे जोड तोडले. मनोज मोरे यांनी महिलेच्या घरात घुसून मारहाण केली. याप्रकरणी दोघांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.