चिंचवडमधून राष्ट्रवादीतर्फे प्रशांत शितोळे, तर राहूल कलाटे यांचा अपक्ष अर्ज दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/े्ोिो.jpg)
पिपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या वतीने प्रशांत शितोळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर, शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड मनपाचे गटनेते राहूल कलाटे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. दोघांपैकी कोण कोणाला मदत करणार हे निवडणूक काळात समोर येणार आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघ भाजपला गेल्याने शिवसेनेचे इच्छुक उमेदवार राहूल कलाटे यांची अडचण झाली. त्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी अर्ज भरण्याची चर्चा सुरू होती. या विधानसभा मतदार संघाचा राष्ट्रवादीने अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सस्पेन्स कायम ठेवला. आज शेवटच्या दिवशी प्रशांत शितोळे यांनी पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज भरला. तर, शिवसेनेचे इच्छुक आणि नाराज राहूल कलाटे यांनी माघार न घेता अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
7 ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्या दिवशी कोण मैदानात कायम राहणार आणि कोण बाहेर पडणार हे समजणार आहे. कलाटे आणि शितोळे दोघेही निवडणुक रिंगणात उतरले तर दोघांपैकी कोणाचा कोणाला फायदा होणार हे मतदानाच्या दिवशी कळणार आहे. शेवटी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांना टक्कर देणे एवढे सोपे काम नाही.