Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

मोठी बातमी! पुण्यात कंटेनरमध्ये सापडलं १३८ कोटींचं सोनं

पुणे | विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. यातच पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आज पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान तबब्ल १३८ कोटी रुपये किमतीचा सोन्याने भरलेला ट्रक पकडला आहे. हे कोट्यावधीचे सोने कुठे चालले होते? याबाबतची अधिक चौकशी पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

एका संशयित वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात हे सर्व सोन्याचे दागिने सापडले. हे सोनं नेमकं आलं कुठून, कुठे जात होतं? कोणाचं होतं याचा तपास आता पोलीस करत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे १३८ कोटी रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, डिलिव्हरी ट्रान्सपोर्टची असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा    –     शरद पवारांना फोडाफोडीचं नोबल दिलं पाहिजे; उदयनराजे भोसलेंचा टोला

दरम्यान, पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून ५ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या घटनेमुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. सोमवारी रात्री पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून ५ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button