Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना धान्य वाटप
![Distribution of foodgrains to the needy on the occasion of MLA Ram Satpute's birthday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/मदत.jpg)
निगडी |महाईन्यूज|
माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त निगडी ओटास्कीम परिसरातील गरजूंना धान्य वाटप करण्यात आले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. लॉकडाउनमुळे गोरगरिबांचे नागरिकांचे हाल झाले आहेत. त्यामुळे निगडी ओटास्कीम परिसरातील कुटुंबाना संस्कृती सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून धान्य वाटप करण्यात आले. यावेळी उद्योजक विकिशेठ बोऱ्हाडे, उद्योजक संदीप गर्जे ,उद्योजक राहुल चंदेल , ऊर्जा फाउंडेशनचे किरण खोजे ,अमर देशमुख इतर कार्यकर्ते उपास्थित होते.