breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीने पिंपरीची जागा सोडावी रिपाइंची आग्रही मागणी

शहर कायकारिणीच्या पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र वाटपाच्या कार्यक्रमादरम्यान पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पिंपरी : महायुतीच्या जागा वाटपात अपवादात्मक परिस्थितीत काही ठिकाणच्या जागा बदलण्याचे संकेत आहेत. पिंपरी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या अपक्ष उमेदवाराला मिळालेली मते लक्षात घेत, जागा वाटपात महायुतीने ही जागा रिपब्लिकन पक्षाला सोाडवी, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कमालीचे आग्रही आहेत.

याबाबत लवकरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन ही मागणी त्यांच्याकडे मांडणार आहेत. आरपीआयचा आग्रह या जागेबाबत वाढत असल्‍याने पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्‍या जागेवरुन महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्‍यता दिसत आहे.शहर कायकारिणीच्या पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र वाटपाच्या कार्यक्रमादरम्यान पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पिंपरीत पार पडलेल्या या बैठकीला रिपाइंच्या महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख, अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश सरचिटणीस खाजाभाई शेख, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सम्राट जकाते, महिला आघाडी प्रदेश सचिव ईलाताई ठोसर आदी उपस्थित होते.

हेही वाचा     –      पूजा खेडकरला मोठा दिलासा, २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश 

ही बैठक पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती, तरी त्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत शहर पातळीवरील तीनही विधानसभा मतदार संघांमध्ये पक्षाची नेमकी भूमिका काय असणार अहे, यावर चर्चा करण्यात आली.

याबाबत चंद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या की, पिंपरीत रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद आहे. कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आम्ही या मतदार संघात लक्षणीय मते घेतली आहेत.त्यामुले आमचा या मतदार संघावर दावा आहे. महायुतीच्या घटक पक्षातील तत्कालीन आमदार स्व. लक्षमण जगताप यांचा आम्हाला पाठिंबा होता.तर लोकसभेतील कामाची पावती म्हणून खासदार श्रीरंग बारणे यांनी आमच्या पाठिशी ठामपणे उभे रहावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी आता अन्य राजकीय पक्षाच्या पालख्या आम्ही वाहणार नाही. या मतदार संघात आमची ताकद आहे, त्यामुळे हा मतदार संघ आम्हाला दिल्यास, पक्षाचा पहिला आमदार आम्ही विधानसभेत पाठवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने आता पिंपरी विधासनसभा मतदार संघासाठी आग्रही असलेले रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकार्‍यांचे शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन,याबाबतचे निवेदन सादर करणार आहे. यावर आठवले कोणती भुमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button