Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम लवकरच मार्गी लागणार, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

पुणे/पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवडमधील मेट्रोचे काम युध्दपातळीवर सुरू असतानाच आता शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिका क्र. 3 चे काम लवकरच मार्गी लागणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या मालकीची सुमारे 15 हजार चौ. मी. जागा लागणार आहे. या जमिनी देण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सांगितले.

त्या दृष्टीने उपमुख्यमंत्री पवार यांनी ‘पीएमआरडीए’च्या कामकाजाचा मंत्रालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरे तसेच पुणे जिल्ह्यातील 9 तालुक्यांचा समावेश पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात आहे. पीएमआरडीच्या प्रकल्पांसाठीचे आर्थिक नियोजन, मनुष्यबळ, उत्पन्नाचे स्रोत, रिंगरोड, रस्ते, मेट्रो मार्गिका, प्रधानमंत्री अवास योजनेंतर्गत परवडणार्‍या घरांचे प्रकल्प, नगररचना योजना, टाऊनशिप, इंद्रायणी नदीसुधार, प्राधिकरणाच्या हद्दीत पाणीपुरवठा आदी बाबींचा सविस्तर आढावा पवार यांनी घेतला.

पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुणे शहर तसेच जिल्ह्यातून जलद पोहोचता येईल, अशा पद्धतीने रस्त्यांचे नियोजन करावे. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रस्तावित शिवाजीनगर-हडपसर-फुरसुंगी-शेवाळवाडी मेट्रोसाठी भूमिसंपादन; तसेच अन्य बाबी लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. या बैठकीस पीएमआरडीएचे आयुक्‍त विक्रम कुमार, मुख्य नियोजनकार विवेक खरवडकर, अतिरिक्‍त आयुक्‍त प्रवीणकुमार देवरे आदी अधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button